Tuesday 29 January 2019

कर्णबधिर मुलांसमवेत रोबोटिक्स कार्यशाळा



शैक्षणिक विषयावरील अधिकाधिक नवनवीन शिक्षण घेण्याबाबत, वेगवेगळ्या आयजीसीएसई शाळांमधील मुलांनी रोबोटिक्स कार्यशाळांमध्ये रस दर्शविला आहे. त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांनी एनजीओंतर्फे त्यांनी जे काही शिकले आहे ते त्या शिक्षणापासून वंचित मुलांना प्रदान करणे आवश्यक आहे.

भविष्यातील जग रोबोटिक्स केंद्रित आहे. जोश फाऊंडेशनच्या सहकार्याने टीम ल्युमिनोसिटीक्सच्या 'रोबोटिक्सचा तास' ही कार्यशाळा म्हणजे प्रगत लोकांसाठी आशा बाळगणारा पहिला सहभाग होता.

ऑडीओलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट देवांगी दलाल यांनी सांगितले, "जर का मुलांना ही 'रोबोटिक्स कार्यशाळा' आवडली तर येथे त्यांच्यासाठी अजून बरंच काही आहे." लेगो मिंडस्टॉर्म्स ईव्ही 3 किट्सचा वापर करून, त्यांना प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाद्वारे समाजाची परतफेड करणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे.

कर्णबधिरतेशी लढणाऱ्या मुलांच्या उन्नतीसाठी 'जोश फाउंडेशन या एनजीओची स्थापना ईएनटी विशेषज्ञ डॉ. जयंत गांधी यांनी ऑडीओलॉजिस्ट-स्पीच थेरेपिस्ट देवंगी दलाल यांच्यासह केली, ज्यायोगे भिन्न-भिन्न कमतरता असणाऱ्या मुलांचे सशक्तीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.

"आम्ही या कर्णबधिर मुलांना आधार देत आहोत. मुलांच्या एकूण प्रगती आणि विकासात विज्ञान मदत करते. रोबोटिक्स आणि मशीन कशी काम करतात हे या कर्णबधिर मुलांना देखील कळले पाहिजे यासाठी केला गेलेला हा एक प्रयत्न आहे." - ईएनटी विशेषज्ञ डॉ. जयंत गांधी.

"शिक्षणातील समतोल आणि सीएसआर काम ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांसमवेत घडविणे हा त्यांच्यातील एक पैलू आहे. तर दुसरीकडे, कर्णबधिर मुलांनी रोबोटिक मशीन वैयक्तिक पातळीवर कधीच पाहिलेले नसतात. त्यांनी ते फक्त टीव्हीवर पाहिलेले असतात, परंतु त्यांनी ते कधी बनविलेले नाहीत" असे देवांगी दलाल यांनी सांगितले.

टीम ल्युमिनोसिटीचे प्रतिनिधी सांगतात की, "आमच्या कार्यसंघात रोबोटिक्सच्या जगाने आकर्षित झालेले असे १२-१४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहेफेब्रुवारी महिन्यात पुणे येथे होणाऱ्या पहिल्या टेक चॅलेंजमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. उद्याचे भविष्य असणाऱ्या तरुणांना शिक्षित करणे ज्ञानाचा प्रसार करणे हा आमचा दृष्टिकोन आहे."


निशा जामवाल आणि डीटेल फाऊंडेशन यांची अविकसित खेड्यांमध्ये तंत्रज्ञानासाठी हातमिळवणी केली.


निशा जामवाल यांनी डीटेल फाऊंडेशनचे संस्थापक योगेश भाटिया यांच्यासाठी सुक मध्ये लंच आणि पॅनेल डिस्कशन आयोजित केले. या फाउंडेशनच्या पुढाकाराने 40 कोटी भारतीय आणि अविकसित गावांना जोडण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. प्रसंगी बैठकीस निशा जामवाल आणि योगेश भाटिया यांच्यासह अनु मलिक, रणजीत, मृणालिनी देशमुख, अनुप जलोटा, अमृता रायचंद आणि ऍमी बिलिमोरिया यांनी आपल्या उपस्थितीने रंगत आणली