आदित्य ठाकरे, सोनू सूद, जैकी श्रॉफ, शान, सोफीया चौधरी, मनीष पॉल, करणवीर बोहरा, अनु मलिक, श्यामक डावर, विवेक गोयनका, जेरीना वहाब, आदित्य पंचोली, , एमिवे बंटाय आणि फिल्म, सामाजिक, राजनैतिक आणि व्यावसायीक क्षेत्रातील अनेक दिग्गज ह्यावेळी उपस्थित होते.
भारतात वायु प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. ही समस्या धूम्रपान, उच्च रक्तदाब, कुपोषण आणि मधुमेहासारख्या जोखीम घटकांपेक्षाही जास्त मोठी आहे. शहरी भागात अधिक प्रमाणात उत्सर्जन चे कारण वाहने आणि उद्योगजग आहे, पण दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात स्वयंपाक तयार करण्यासाठी तसेच शरीराला उबदार ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात नसलेल्या पिकांना तांत्रिक पद्धतीने न हटवता त्यांना जाळले जाते, हीच पद्धत शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या जास्त फायदेशीर विकल्प असते. हेच ते कारण ज्यामुळे धूर आणि स्मॉग निर्माण होतो. वायु प्रदूषणमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो, एलर्जी, ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या रोगामुळे दरवर्षी 2 दशलक्ष भारतीयांचा अकाली मृत्यू होतो. इतकेच नाही तर नैराश्यासह मानसिक आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी देखील हे जबाबदार असते. संपूर्ण जगभरात वायु प्रदूषण हा महामारीचा विषय आहे; विषारी धूरामुळे प्रदूषित वायुमध्ये श्वास घेतल्यामुळे कित्येक प्राण्यांचा देखील मृत्यू झाला आहे.
भारतात भामला फाऊंडेशनने जागतिक पर्यावरण दिन, २०१९ प्रित्यर्थ चा हा कार्यक्रम पर्यावरण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र संघटना यांच्यासाहाय्याने आयोजित केला आहे. बीट वायू प्रदूषण आणि #breathlife विषयासह ह्या वर्षीचा हा कार्यक्रम आयोजला गेला होता. ह्या उपक्रमाद्वारे भारतात वायु गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मानवी आरोग्यास संरक्षित करण्याचा उद्देश आहे.
भामला फॉउंडेशन त्यांच्या पर्यावर्णाच्या ह्या पुढाकारद्वारे वायू प्रदूषणाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी नेहमीच कार्यरीत आहे, आणि 'बीट वायु प्रदूषण' यूएनओ पुढाकाराशी संबंधित आहे. असिफ भामला यांनी #beatplasticpollution ह्या गाण्यानंतर ह्यावर्षी आणखी एक गाणे आणले. 'हवा आने दे' ह्या संगीतमय कॅम्पेन मध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड दिग्गजांना एकत्र आणले. ह्यामध्ये स्वानंद किरकिरे, शान, दीया मिर्झा आणि राजकुमार राव यांच्यासारख्या अजून ही प्रख्यात व्यक्ती सामील आहेत.
आसिफ भामला यांनी भामला फाउंडेशनच्या माध्यमातुन लोकांना पर्यावरणाबद्दल अधिक जागृतता वाढवण्यासाठी वृक्षरोपण यांसारख्या मोहीम राबवल्या तसेच संजय दत्त यांच्या हस्ते पेपर बॅग बनवून ह्या मोहिमेकडे लक्ष खेचून घेतले.
याप्रसंगी भामला फाउंडेशनचे आसिफ भामला, मीराज हुसैन आणि सेहर भामला, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सोनू सूद, जैकी श्रॉफ, शान , सोफिया चौधरी, मनीष पॉल, करणवीर बोहरा, अनु मलिक, शामक डावर, विवेक गोयंका, एमीवे बंटाय , मधुर भंडारकर, मिलिंद देवड़ा, आशीष शेलार, सचिन भाऊ अहिर, अशोक कपूर , परमीत सेठी, अर्चना पूरन सिंह, एडगार्ड कागन (यूएसए के कॉन्सर्ट जनरल), आलोक कुमार चौधरी (एसबीआय के)आणि स्वानंद किरकिरे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. इतकेच नाही तर चित्रपट, सामाजिक, राजनैतिक, व्यावसायीक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्त्व बांद्राच्या कार्टर रोड येथील एम्पिथियेटर मध्ये आयोजित केलेल्या ह्या पर्यावरण दिवसाच्या उत्सवात सहभागी होते. मीराज हुसैन आणि रुबी भाटिया ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन प्रति आपण आपल्या जवाबदाऱ्या पटवून देत अक्षय कुमार म्हणाले, "प्रदूषित हवा आपल्यास किती नुकसान करते हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. न जन्मलेल्या मुलापासून ते शाळेत जाण्यासाठी मुलांनापर्यंत, उघड्या आगीमध्ये अन्न शिजवणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी देखील खूप धोकादायक आहे. लक्षात ठेवा स्वच्छ हवा हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. चल, #HawaAaneDe."
विक्की कौशल म्हणाले, "शुद्ध हवा प्रत्येक मनुष्याचा मूलभूत अधिकार आहे. आपण एकत्र येऊन शपथ घेऊ की आपण आपले जीवन आणि आपला देश प्रदूषणमुक्त करू. "
राजकुमार राव म्हणाले, "पर्यावरण, संयुक्त राष्ट्र संघटना, भामला फाऊंडेशन आणि एसबीआय मंत्रालयाच्या ह्या पुढाकाराचा मीपण एक भाग आहे ह्याचा मला अभिमान आहे. शुद्ध हवा ही निसर्गाची सर्वांत मोठी देणगी आहे परंतु आपण ती कोणत्याही प्रकारे शिल्लक ठेवलेली नाही. हा मुद्दा गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे.
शान म्हणाले, " संयुक्त राष्ट्र संगठनेच्या ध्येयानुसार, आम्ही फक्त तरुणांना पर्यावरण संबंधित शिक्षण देत नाही, तर हा संदेश प्रत्येकासाठी आहेत."
बांद्रा पश्चिमधील विधायक आशीष शेलार म्हणाले, "आपण ह्या जगात पिनवरून विमानापर्यंत सगळंच बनवू शकतो आणू शकतो, परंतु नैसर्गिक पद्धतीने ऑक्सिजन तयार करण्यासाठी आमच्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नाहीत. ह्यामध्ये फक्त वृक्षरोपण जास्त फायदेशीर आहे, म्हणून आम्ही आक्रमकपणे जास्तीत आणि जास्त प्रमाणात रोपे लावावी. "
शंकर महादेवन म्हणाले, "प्रदूषणाला आपण एक नाईलाज रोग मध्ये परिवर्तित करत आहोत आणि ह्याबद्दल आता विचार करण्याची गरज आहे. आपल्याद्वारे आणलेले छोटे छोटे बदल देखील मोठा बदल घडवू शकतात." भामला फाऊंडेशन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या या उपक्रमासाठी, आयुष्मान खुराना आणि जाह्नवी कपूर यांनीही त्यांचे संदेश नोंदविले आहेत.
जसे जसे हा व्हिडिओला अजून प्रसिद्धी मिळेल तस तसे ह्या मोहिमेला अजून गती प्राप्त होईल आणि मोठ्या प्रमाणात लोक ह्यात सामील होतील. #HawaAaneDe हे गाणे आणि ही संपूर्ण मोहिम भामला फाऊंडेशनने पर्यावरण मंत्रालय, संयुक्त राष्ट्र संघटना आणि चित्रपट उद्योगातील लोकांच्या मदतीने तयार केली आहे. आपण नाश जवळ येताना पाहत आहात, तसतसे आपल्याला हे लक्षात येईल की हा सिद्धांत मुख्य वास्तविकता आहे. ग्लोबल वार्मिंगबद्दल प्रत्येक चेतावणी खरे असल्याचे सिद्ध होत आहे. जर एखाद्या व्यक्तीने आगामी काही वर्षांमध्ये आपले जीवन बदलले नाही तर कोणीही पर्यावरणाचे कायमचे नुकसान थांबवू शकत नाही.
या संदर्भात भामला फाउंडेशन चे आसिफ भामला म्हणतात, " मला खूप आनंद आहे कि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच फिल्मी जगताच्या दिगज्ज भामला फाउंडेशच्या ह्या आगळ्या वेगळ्या मोहिमेत मला सहाय्य आणि योगदान देत आहेत ज्यामुळे आपल्या परिवाराला आणि पुढच्या पिढीला देखील शुद्ध हवेत श्वास घेता येईल. आता वेळ आली आहे की आपण पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी करावे, ज्या हवेत आपण श्वास घेतोय ती प्राणघातक ठरू नये. यामूळे आपल्याला महत्व पूर्ण बदल आणलेच पाहिजे."
No comments:
Post a Comment