उत्साही दिव्यंका त्रिपाठी दहिया म्हणते की, “कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी सदस्य बनण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे, विशेषत: जगभरातील सिनेमा पाहण्याचा बहुमान मला लाभला आहे. मी अपेक्षा करते की हा एक समृद्ध करणारा अनुभव असेल, माझ्यासाठी चित्रपटांसंदर्भी विविध सामग्री आणि कामगिरी पाहणे खूप रोमांचक आहे! ”
२०१९ च्या कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहिया ज्यूरी म्हणून लाभली असून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसंगी बेथन सैय्यद - असेंम्बली मेम्बर अँड चेअरमनऑफ कल्चर अँड मीडिया (वेल्स), नोमेन जे, फ्लॉरेन्स एईसी - ऑस्कर नामित डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर, वॉरेन - दिग्गज ब्रिटिश दिग्दर्शक, कीथ विलियम्स - वीडियो कॉन्सेप्चुअल आर्टिस्ट आणि जो फ़ेरेरा - ब्रिटिश अभिनेता यांसारखी विख्यात व्यक्तिमत्त्वे देखील ज्यूरी म्हणून उपस्थिती दर्शवणार आहेत.
कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सीआयएफएफ) चे संस्थापक राहिल अब्बास म्हणतात की,“एक राष्ट्र म्हणून वेल्स, कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थित असलेल्या सर्व चित्रपट निर्मात्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि चित्रपट निर्मात्यांना वेल्स येथील सौंदर्य आणि प्रतिभा पाहण्यासाठी आमंत्रित करीत आहोत."
कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २४ ऑक्टोबर २०१९ ते २७ ऑक्टोबर २०१९ या काळात कार्डिफ बे, या वेल्सच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक पियरहेड इमारतीत आयोजित करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment